केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आता ‘स्मार्ट व्हिलेज’साठी पुढाकार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या प्रकल्पावर शुक्रवारी (दि.21) त्यांच्या निवासस्थानी बैठकीमध्ये चर्चा झाली. गडकरी यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’चे आपले व्हिजन मांडले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना गडकरी …
केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आता ‘स्मार्ट व्हिलेज’साठी पुढाकार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या प्रकल्पावर शुक्रवारी (दि.21) त्यांच्या निवासस्थानी बैठकीमध्ये चर्चा झाली. गडकरी यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’चे आपले व्हिजन मांडले.
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना गडकरी यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये स्वस्त दरातील घरकुल, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाळा, जलकुंभ, खेळाची मैदाने, वैद्यकीय सोयीसुविधा, दैनंदिन गरजा आदींचा समावेश असणार आहे.
या दरम्यान ‘स्मार्ट व्हिलेज’साठी जागेची निवड करण्यासंदर्भातही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. उद्योग, शिक्षण, आरोग्य व्यवस्था या सर्वांनी परीपूर्ण असे ‘स्मार्ट व्हिलेज’ अस्तित्वात येणार आहे. खेड्यातील लोकांचे स्थलांतर थांबेल आणि विकासातील अडसर दूर होईल, असा विश्वास गडकरीनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, म्हाडाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता भानुसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :

शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योग आवश्यक- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूरकरांना मिळणार खापरी ते मिहानपर्यंत फीडर सुविधा
भंडारा : महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन