महाराष्ट्र आणि तीन राज्यांतील मतदार याद्या अद्ययावत होणार

महाराष्ट्र आणि तीन राज्यांतील मतदार याद्या अद्ययावत होणार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी काळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२२) याबाबत राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत.
महाराष्ट्र आणि इतर तीन राज्यांत २० ऑगस्टपर्यंत सर्व मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहेत. मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे, हरियाणा विधानसभा ३ नोव्हेंबरला विसर्जीत होणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा २०१८ पासून विसर्जीत अवस्थेत आहे. तिथे सध्या राष्ट्रपती राजवाट सुरु असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत तिथे निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.