जळगाव : जामनेर पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जामनेर येथील जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर शुक्रवारी (दि.२१) गुन्हे दाखल करण्यात आले. या हल्ल्यात १५ पोलीस जखमी झाले असून याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. केतक निभोरा गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी सुभाष भिल (35) नावाच्या संशयितास भुसावळ येथून बेड्या …

जळगाव : जामनेर पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : जामनेर येथील जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर शुक्रवारी (दि.२१) गुन्हे दाखल करण्यात आले. या हल्ल्यात १५ पोलीस जखमी झाले असून याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
केतक निभोरा गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी सुभाष भिल (35) नावाच्या संशयितास भुसावळ येथून बेड्या ठोकून जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी आणण्यात आले. तेव्हा संतप्त जमावाने संशयिताला आपल्याकडे सोपवा, अशी मागणी केली. पोलिसांनी संतापलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो आपल्या मागणीवर अडून होता. नंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करून तेथील साहित्याची तोडफोड केली. यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १५ कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.