यवतमाळ : वणी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यांना अटक

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना वणी येथे बुधवारी (दि.19) समोर आली आहे. तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी घेऊन जावून तिच्यावर अत्याचार केले. यानंतर पीडितेने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी रात्री शोध घेऊन तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. वणी शहरापासून जवळच …

यवतमाळ : वणी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यांना अटक

यवतमाळ, Bharat Live News Media वृत्तसेवा : तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना वणी येथे बुधवारी (दि.19) समोर आली आहे. तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी घेऊन जावून तिच्यावर अत्याचार केले. यानंतर पीडितेने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी रात्री शोध घेऊन तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
वणी शहरापासून जवळच असलेल्या राजूर येथील तीन तरुणांनी चायनीजच्या एका दुकानावर काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री ऑटोतून अपहरण केले. यानंतर तिला वणी-घुग्घूस मार्गावर निर्जनस्थळी नेले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला वणीच्या टिळक चौकात आणून सोडून दिले.
यानंतर वणी पोलिस ठाणे गाठून तेथे पोलिसांसमोर सर्व हकीकत सांगितली. यानंतर तीन संशयित आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली  आहे. शंकर ऊर्फ राकेश नामदेव भोस्कर (वय.24), राहुल राकेश यादव (वय. 25), शंकर यादव (वय. 28) तिघेही रा. राजूर (कॉ.) यांना शोधून गजाआड केले आहे. या अत्याचार प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहेत.
हेही वाचा :

नागपूरकरांना मिळणार खापरी ते मिहानपर्यंत फीडर सुविधा
कोल्हापूर : कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यात खून; पतीला अटक
बुलढाणा: दत्तपूरचे पुरोगामीत्व; विधवांनी लावले कुंकू अन् वटवृक्षाला घातल्या फेऱ्या