नागपूर : ओला चालकाचे अपहरण करुन त्याला डांबून मारहाण
नागपूर, Bharat Live News Media वृ्त्तसेवा : एका ओला चालकाने अचानक कार थांबविल्याने मागून येणारी दुसरी कार धडकली. मागील कारचालक पती आणि पत्नी तसेच इतर मित्रांनी संतापाच्या भरात ओला कॅब चालकाला जबर मारहाण केली. यासोबतच त्याचे अपहरण करून घरी नेले आणि खोलीत डांबून बेदम मारहाण केली. सौरभ दरमारे असे जखमी कॅबचालकाचे नाव आहे. सौरभने प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिहानच्या आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी नेहमीप्रमाणे (एमएच. 31 एफसी 3323) क्रमांकाची कार मंगळवारी (दि.11) मध्यरात्री 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास नरेंद्र नगरहून उड्डाणपुलाच्या दिशेने निघाली. या कारचा चालक सौरभ दरमारे याने अचानक रस्त्याच्या मधोमध कारचा ब्रेक लावला. यामुळे मागून येणारी (एमएच 40 एसी 8968) या क्रमांकाची कार त्यावर आदळली.
या कारचा चालक अमित तायडे, त्याची पत्नी आणि एक महिला आणि पुरुष मागे बसलेला होता. हे चौघेही कारमधून बाहेर आले आणि त्यांनी सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर अमित तायडे, त्याची पत्नी आणि त्याच्या मित्रांनी दुसरी एक ओला कॅब बुक करून सौरभला चंद्रनगर येथील स्वत:च्या घरी नेले. तिथे त्याचा मोबाईल व त्याच्या गाडीच्या चाव्या हिसकावून घेतल्या. अमितने त्याला घराच्या टेरेसवर नेऊन काठीने तसेच चावीच्या टोकाने मारहाण केली. या मारहाणीत सौरभ बेशुद्ध झाला.
दरम्यान, अमितने त्याच्या चार ते पाच मित्रांनाही तेथे बोलावून घेतले. जखमी सौरभने अमितच्या एका मित्राला पाणी देण्याची विनंती केली. तो पाणी आणण्यासाठी गेला असता सौरभने हिंमत एकवटून अमितच्या घराशेजारील घराच्या छतावर व तिथून इतरत्र व शेवटी सौरभने जीव वाचवण्यासाठी नाल्यात उडी घेतली. त्यानंतर अपार्टमेंटच्या वॉचमनच्या मोबाईलवरुन फोन करुन भावाला बोलावून घेतले.सौरभने प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान बुधवारी (दि.12) दुपारी सौरभची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
हेही वाचा :
भंडारा : दोघांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण
नागपूर : पब्जीच्या नादात वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा मृत्यू
जळगाव: १० हजारांची लाच घेताना पीएसआय ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात