अमेरिकन महिलेस ३०० रुपयांचे दागिने तब्बल ६ कोटींना विकले

जयपूर;  वृत्तसंस्था : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये अमेरिकेतील एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला राजस्थानमधील दुकानाच्या मालकाने 300 रुपयांचे कृत्रिम दागिने तब्बल 6 कोटी रुपयांना विकून शेंडी लावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. महिलेचे नाव आहे चेरीश. तिने येथील सोने-चांदीच्या दुकानातून सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने खरेदी केले …

अमेरिकन महिलेस ३०० रुपयांचे दागिने तब्बल ६ कोटींना विकले

जयपूर;  वृत्तसंस्था : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये अमेरिकेतील एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला राजस्थानमधील दुकानाच्या मालकाने 300 रुपयांचे कृत्रिम दागिने तब्बल
6 कोटी रुपयांना विकून शेंडी लावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
महिलेचे नाव आहे चेरीश. तिने येथील सोने-चांदीच्या दुकानातून सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने खरेदी केले होते. दागिने खरेदी केल्यानंतर ती पुन्हा अमेरिकेला गेली होती. एप्रिल महिन्यात तिने एका प्रदर्शनात हे दागिने ठेवले होते. तथापि, ते बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. चेरीश ताबडतोब जयपूरला दाखल झाली आणि तिने दुकानाचा मालक गौरव सोनी याला जाब विचारला. मात्र, दुकानमालकाने कानांवर हात ठेवून तिचे आरोप फेटाळून लावले. यानंतर तिने जयपूर पोलिस ठाण्यात सोनीविरुद्ध तक्रार दाखल केली. हे कमी म्हणून की काय तिने अमेरिकेच्या दूतावासाकडेही मदत मागितली. दूतावासाने पोलिसांकडे हे प्रकरण उपस्थित केले आहे.