नागपूर : पब्जीच्या नादात वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा मृत्यू
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपुर येथील अंबाझरी तलावावर वाढदिवसानिमित्त रात्री मित्रांना पार्टी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पब्जी खेळायच्या नादामध्ये 15 फुट खड्डयामध्ये पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुलकित राज शहदादपुरी (वय.16) असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र हा वाढदिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला.
पुलकित आपला वाढदिवस घरच्यांसोबत साजरा करुन मित्राला रात्री पार्टी देण्यासाठी घरच्यांची नजर चुकवून तो घराबाहेर गेला. सर्वत्र शांतता झाल्यावर तो मित्राला घेऊन अंबाझरी तलावावर गेला. काही वेळ तिथे वेळ घालवल्यानंतर पुलकित पब्जी खेळत बसला होता. घरी परत जात असतानाच लक्ष नसल्याने तो 15 फुट खोल खड्ड्यात पडला. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.
त्याचा मित्र ऋषिकेश मोबाईलच्या प्रकाशात खड्डा ओलांडून पुढे निघाला. त्याच्या मागे पुलकित होता. मात्र, पुलकित मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त होता. त्याला खड्डा न दिसल्यामुळे तो 15 फूट खड्ड्यात पडला. ऋषीला आवाज येताच त्याने मागे वळून बघितले असता पुलकित दिसला नाही. त्याने शोधा-शोध करुन या घटनेची कुटुंबीय तसेच पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस अंबाझरी घटनास्थळी पोहचले. अग्निशमन जवानांच्या मदतीने पुलकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या नंतर शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
हेही वाचा :
भंडारा : दोघांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण
तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसला मिळणार लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद
नंदुरबार : धक्कादायक! महिलेचे शीर आढळले; परिसरात खळबळ