‘मोदी का परिवार’ प्रोफाईलवरून हटविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने देशभरात सोशल मीडियावर चालविलेली ‘मोदी का परिवार’ ही मोहीम आता थांबवून कार्यकर्त्यांनी नावासमोरून ‘मोदी का परिवार’ हटवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावरील ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून केले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात, देशातील लोकांनी माझ्याबद्दल आपुलकीचे प्रतीक म्हणून सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ ही मोहीम …
‘मोदी का परिवार’ प्रोफाईलवरून हटविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने देशभरात सोशल मीडियावर चालविलेली ‘मोदी का परिवार’ ही मोहीम आता थांबवून कार्यकर्त्यांनी नावासमोरून ‘मोदी का परिवार’ हटवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावरील ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून केले आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात, देशातील लोकांनी माझ्याबद्दल आपुलकीचे प्रतीक म्हणून सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ ही मोहीम चालवली. त्यातून मला खूप बळ मिळाले, असे मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपण सर्व एक कुटुंब आहोत, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यामुळे, मी आभार मानतो. पण आता  ‘मोदी का परिवार’ हटवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
मोदींच्या प्रोफाईलवर आता संविधानाला नतमस्तक होतानाचा फोटो
पंतप्रधानांनी ‘मोदी का परिवार’ हटवण्याचे आवाहन केल्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया खात्यावरील प्रोफाइल फोटोही बदलले आहेत. संविधानाला नतमस्तक होताना पंतप्रधानांचा नवीन प्रोफाइल फोटो अपडेट करण्यात आला आहे.