नांदेड : खाजगी शिक्षण संस्थांच्या विरोधानंतरही जि.प.च्या तब्बल 27 शाळेत वर्गवाढ
वाई बाजार; Bharat Live News Media वृत्तसेवा : खाजगी शिक्षण संस्थांनी छुपा विरोध केल्यानंतरही माहूर तालुक्यातील जि.प.च्या तब्बल २७ शाळांत वर्गवाढीची मान्यता नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यातील अनेक सरकारी शाळेत वर्गवाढ होवून विद्यार्थ्यांना पुढील वर्गाचे शिक्षण प्राप्त होणार असल्याने शिक्षण विभागाच्या निर्णयाचे स्वागत शिक्षणप्रेमींकडून होत आहे.
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिऊर, अंजनखेड, आसोली, मेट तांडा, पडसा नवा, उमरा तांडा, चोरड, जुनापानी, लसनवाडी, रूपला नाईक तांडा, दिगडी कुत्तेमार, गुंडवळ तांडा, जग्गू नाईक तांडा, लखमापूर तांडा, नखेगाव, केरोळी, मालवाडा, शेकापूर, सावरखेड, चौफुली, कोलामखेड, भिमपूर व मुंगशी या २३ ठिकाणच्या जि.प.च्या शाळेत आता इयत्ता ५ वी चा वर्ग वाढ करण्यात आला आहे.
तर जि.प. शाळा मौजे तुळशी तांडा व दहेगाव या ठिकाणी इयत्ता आठवीचा वर्ग वाढ करण्यात आला आहे… त्याचबरोबर प्राथमिक शाळा इवळेश्वर व जि.प.कें.प्रा. शाळा वाई बाजार येथे नवव्या वर्गाला वाढ देण्यात आली आहे. शाळांमध्ये आवश्यकतेनुसार वर्गवाढ देवून विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था पुरवण्याच्या स्वागतार्ह निर्णयाचे शिक्षणप्रेमी मंडळींकडून स्वागत करण्यात येत असून शिक्षण विभागाचे पालक वर्गातून आभार मानल्या जात आहेत.