परभणी: मानवत येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार

परभणी: मानवत येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार

मानवत, Bharat Live News Media वृत्तसेवा : मानवत शहराबाहेरील बायपास रोडवर एका कारने दिलेल्या धडकेने पायी चालणाऱ्या एका ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास राघवेंद्र जिनिंग समोर घडली. शेख शकील शेख मोहिनोद्दीन (वय ६२, रा. शंकरनगर, खामगाव, जि. बुलढाणा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख शकील कापूस भरण्यासाठी राघवेंद्र जिनिंग मिलमध्ये सोमवारी ट्रक घेऊन आले होते. रात्री ८.३० च्या सुमारास ते सहकारी चालकासोबत जेवणासाठी पायी जात होते. यावेळी भरधाव कारने (एमएच १६ बीसी १९३३) त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. मानवत ग्रामीण रुग्णालयात त्यांना रात्री १० च्या सुमारास दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजा पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. शेख सरवर शेख चाँद यांनी फिर्याद दिली. कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा 

Parbhani Crime| भयंकर : परभणीत प्रेमविवाह केलेल्या तरुणाचा वडील, भावाकडून खून
परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा
परभणी : माजलगाव – नांदेड राज्य महामार्गावर अपघात, वडील-मुलाचा मृत्यू