Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून भारतील काही राज्यांमध्ये दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील काही राज्यातील भागात पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुढील ३ ते ४ दिवस भारतातील काही राज्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा (Heavy to very heavy rainfall) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीननुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत भारतातील उप-हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता (Heavy to very heavy rainfall) आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात आज (दि.११ जून) आणि उद्या १२ जून रोजी कर्नाटक, केरळ आणि तेलंगणामध्ये मुसळधार ते अति मुसळधार (Heavy to very heavy rainfall) पाऊस सुरू राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.
Isolated extremely heavy rainfall very likely over Sub-Himalayan West Bengal & Sikkim and very heavy rainfall over Assam & Meghalaya during next 3-4 days. pic.twitter.com/6ST8FEIwrT
— India Meteorological Department (@Indiametdept) June 11, 2024
Heat wave to severe heat wave conditions likely to continue over parts of Northwest & East India during next 5 days. pic.twitter.com/UBaZ2aZKPn
— India Meteorological Department (@Indiametdept) June 11, 2024