आंध्र प्रदेश उपमुख्‍यमंत्रीपदासाठी अभिनेते पवन कल्‍याण आग्रही!

आंध्र प्रदेश उपमुख्‍यमंत्रीपदासाठी अभिनेते पवन कल्‍याण आग्रही!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नुकत्‍याच झालेल्‍या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत २१ जागा जिंकणारे जनसेना पक्षाचे (जेएसपी) प्रमुख,  अभिनेते पवन कल्‍याण आता आंध्र प्रदेश मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्‍याचे वृत्त आहे. त्‍यांच्‍या पक्षाने तेलगू देसम पार्टी आणि भाजपसोबत युती करत विधानसभा निवडणूक लढवली होती.
पवन कल्याण यांची जनसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
उपमुख्‍यमंत्रीपदासह पाच कॅबिनेट मंत्रीपदाचीही मागणी
पवन कल्याण यांची जनसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. जेएसपीचे ज्येष्ठ नेते नदेंदला मनोहर यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांना सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा मिळाला.अभिनेतेतून राजकारणी झालेले पवन कल्याण हे आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रीमंडळात आपल्या पक्षाला पाच कॅबिनेट मंत्री पद मिळावेत, अशीही त्‍यांची मागणी आहे.
पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काकीनाडा जिल्ह्यातील पिथापुरम मतदारसंघातून 1,34,394 मतांनी  विजय मिळवला आहे. त्यांनी व्हीएसआरसीपीचे उमेदवार वंगा गीता विश्वनाथ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. पिठापुरम हा कापू समाजाचे वर्चस्‍व असलेला मतदारसंघ म्‍हणून ओळखला जातो. पवन कल्याण आणि वंगा गीता हे दोघेही त्याच समुदायाचे आहेत.
चित्रपटानंतर राजकारणातही यश
जेएसपी प्रमुख पवन कल्याण यांनी १९९६ मध्ये तेलुगू चित्रपट अक्काडा अम्माई इक्काडा अब्बाईमधुन आपल्या करिअरची सुरुवात केली. २००३ मध्ये त्‍यांनी जॉनी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी राजकारणात प्रवेश केला. पवन हे दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे  धाकटा बंधू तर दाक्षिणात्य अभिनेता रामचरण याचे काका आहेत. १३ मे रोजी आंध्र प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकाचवेळी मतदान झाले. राज्यातील १७५ विधानसभा मतदारसंघापैकी तेलगु देसम पार्टीने १४४ जागांवर, जनता सेना पक्षाने २१ जागांवर आणि भाजपने १० जागांवर निवडणूक लढवली होती. तेलुगू देसम पार्टीला १३५, जनसेना पार्टीला २१ तर भाजपने ८ जागांवर विजय मिळवला आहे.
हेही वाचा : 

कन्नड अभिनेता दर्शनच्या अडचणीत वाढ, हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
Aditya-L1 Mission: आदित्य एल-1 चे नवीन यश, सूर्याच्या गतिमान हालचाली टिपल्या