नागपूर : दारूच्या नशेत बायकोला अपशब्द, मित्राचा खून

नागपूर : दारूच्या नशेत बायकोला अपशब्द, मित्राचा खून

नागपूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा दारूच्या नशेत पत्नीबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या मित्राच्या डोक्यावर रागाच्या भरात दगड मारून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पांडुरंग नाटकर (वय 33) राहणार चक्रपाणी नगर असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. अंकुश गणेश आखरे (वय 33) सौभाग्य नगर असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
अंकुश इलेक्ट्रिक वाहन दुरुस्तीचे गॅरेज चालवतो. तर पांडुरंग हा एका कुलर कंपनीत कामाला आहे. दोघेही चांगले मित्र असल्याने ते सोबत दारू प्यायचे. दरम्यान, दारूच्या नशेतच पांडुरंगने अंकुशच्या बाहेर गेलेल्या पत्नीविषयी अपशब्द काढले. यामुळे अंकुशचा राग अनावर झाला. त्याने पांडुरंगच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. एका दणक्यात पांडुरंग खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिसांनी अंशुलला अटक केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : 

जालना : सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; जरांगे यांचा सरकारवर गंभीर आरोप

आंध्र प्रदेश उपमुख्‍यमंत्रीपदासाठी अभिनेते पवन कल्‍याण आग्रही!

SSC Result 2024 | दहावी गुणपत्रिकांचे आज शाळांमध्ये होणार वाटप