वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा माझं कठोर आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेवू अशी चर्चा सरकारकडून सुरु आहे. मला हे खेळवन सरकार कडून सुरू आहे असं दिसतं. मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे. असा अंदाज दिसतो असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार मुद्दामहून बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे. त्यांना आपुलकी असती तर त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली असती असे ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरु आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही. तर मराठे यांना चांगला हिसका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. डॉक्टर म्हणाले मला उपचार घ्यावे लागतील, पण मी घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे असे मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतला.
हेही वाचा :
ब्रेकिंग : ‘NEET’ परीक्षेच्या पावित्र्याला धक्का : सर्वोच्च न्यायालयाने NTA ला बजावली नोटीस
कन्नड अभिनेता दर्शन यांच्या अडचणीत वाढ, हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
मंत्री ॲक्शन मोडमध्ये! परराष्ट्र मंत्री, रेल्वे मंत्र्यांनी स्वीकारला पदभार