नाशिक : ‘शिक्षक’साठी प्रशासनाची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीत येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्र निश्चित करण्यासह कर्मचारी नियुक्ती, मतदान साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यानंतर नूतन खासदार आणि त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा …

नाशिक : ‘शिक्षक’साठी प्रशासनाची जुळवाजुळव

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीत येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्र निश्चित करण्यासह कर्मचारी नियुक्ती, मतदान साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यानंतर नूतन खासदार आणि त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा करत असताना प्रशासन मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. विभागात पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विभागातील ७० हजारांच्या आसपास शिक्षक मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील साधारणत: २६ हजार शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये २६ जून रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याकरिता तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात 15 ही तालुक्यांतील मतदान केंद्रांची यादी तयार केली जात असून, त्यात सुमारे ४५ मतदान केंद्रे निश्चित केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त मतदानासाठी मतपेट्या, मतदान साहित्य, मतदान केंद्रांवर नियुक्त केले जाणारे अधिकारी तसेच कर्मचारी अशा विविध बारीकसारीक बाबींवर सध्या प्रशासन काम करत आहे.
मतदानाची वेळ वाढवली
लोकसभा निवडणुकीत सातही टप्प्यांत मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. हा अनुभव लक्षात घेता, निवडणूक आयोगाने नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतदानाच्या वेळेत वाढ केली आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेतले जाणार होते. नवीन आदेशानुसार सकाळी ७ ते ६ यावेळेत मतदान होणार आहे.
मतदारसंख्येची प्रतीक्षा
गेल्या वर्षी दि. ३० डिसेंबर रोजी शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली. त्यानुसार विभागात ६४ हजार ८०२ शिक्षक मतदार होते. त्यानंतर पुरवणी यादीत नव्याने ५ हजार ५३९ शिक्षक मतदारांनी नावनोंदणीसाठी अर्ज केले होते. या अर्जांची पडताळणी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यामुळे अंतिम मतदार संख्येची प्रतीक्षा कायम आहे.
हेही वाचा:

Nashik Teacher Constituency : शिक्षक निवडणुकीतील प्रमुख करोडपती तर अपक्ष लखपती
Nashik | अपक्ष दराडे अद्याप गायब; कोल्हेंनी डमी उमेदवार उभा केला का ? 
Nashik Teacher Constituency Election | आज अर्ज छाननी, बुधवारपर्यंत माघारी