‘NIA’ची टीम करणार काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तपास

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरच्या रिआसी जिल्ह्यात देवदर्शनहून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी रविवारी हल्ला केला. ही बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० भाविक ठार झाले तर ३३ जण जखमी झाले. भारतीय लष्कराकडून आज (दि.१०) सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. एनआयएची टीम या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार आहे. एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) …
‘NIA’ची टीम करणार काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तपास

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काश्मीरच्या रिआसी जिल्ह्यात देवदर्शनहून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी रविवारी हल्ला केला. ही बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० भाविक ठार झाले तर ३३ जण जखमी झाले. भारतीय लष्कराकडून आज (दि.१०) सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. एनआयएची टीम या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार आहे. एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.

#WATCH | Jammu and Kashmir: FSL (Forensic Science Laboratory) team arrives at the spot in Reasi where a bus was attacked by terrorists yesterday
10 people lost their lives and several were injured in the terror attack.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xGeGtgFbWE
— ANI (@ANI) June 10, 2024

लष्कराच्या गणवेशात झाडीत बसले होते दहशतवादी
शिवखोडा मंदिरात दर्शन घेउन परतणाऱ्या भाविकांना घेऊन कटरा येथे परत निघालेल्या बसवर पोनी जवळच्या तेरयाथ गावाजवळ काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. भाविकांवर हल्ला करणारे दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते. वळणा-वळणाच्या अरुंद रस्त्यावर झाडीत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस थेट दरीत कोसळली. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, लष्कर व निमलष्करी दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मदत व बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. काही जखमींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

#WATCH | Jammu and Kashmir: Visuals of the bus that was attacked by terrorists in Reasi yesterday. 10 people lost their lives and several were injured in the terror attack.
Search operation by Indian Army is underway in the area.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/mX7duzIPPM
— ANI (@ANI) June 10, 2024

दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर
रिआसीचे पोलिस उपअधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, एका वळणावर चेहरे झाकलेल्या दोन दहशतवाद्यांनी बसवर तुफान गोळीबार केला. यामुळे चालक घाबरला व बस दरीत कोसळली. दरीत मृतदेह व जखमी पडले होते. जखमींचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरच्या लोकांनी धाव घेतली. काहींनी पोलिसांना माहिती देताच पथक दाखल झाले. पोलिसांनी काही रिकामी काडतुसे हस्तगत केली. दुसरीकडे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली असून आसपासचा सारा परिसर पिंजून काढला. डोंगराळ आणि दाट झाडीच्या या प्रदेशात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. आज सकाळपासून पुन्हा जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जंगल परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलही घटनास्थळी पोहोचले आहे. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केलेल्या ठिकाणी एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम देखील पोहोचली आहे.

#WATCH | Jammu and Kashmir: Search operation by Indian Army is going on in Reasi after a bus was attacked by terrorists near Shiv Khori Shrine in Reasi yesterday. Drones are being used to search the forest area.
10 people lost their lives and several were injured in the terror… pic.twitter.com/05Mzq5seYs
— ANI (@ANI) June 10, 2024

हेही वाचा : 

शपथविधीआधीच मोदी ३.० सरकारच्या अजेंड्यावर मोहोर
गडकरी, गोयल कॅबिनेट; मोहोळ, आठवले, खडसे राज्यमंत्री