धक्कादायक! धुळ्यात गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू; दोघांना अटक

धक्कादायक! धुळ्यात गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू; दोघांना अटक

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन मुलाच्या गुदद्वारात वाहनांमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेसरचा पाईप टाकून हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (वय १४) रा. सुकासन बारोयारी जि. कटीयार था. सिमापूर बिहार असे या बालकाचे नाव असून याप्रकरणी शिवाजी लक्ष्मण सुळे (वय २३, रा. शिंदे नगर मोहाडी ता. धुळे) व रोहित राजू चंद्रवंशी (वय २३, रा. लळींग ता.धुळे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलजवळ असलेल्या फेमस टायर हाऊस येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर मोहाडी पोलिस ठाण्यात खून व पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे मृत बालकाबद्दल तीव्र भावना व्यक्त झाल्या असून संशयीतांविरुध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बिहार राज्यातील चांदपुरी येथे राहणारे मोहम्मद मुजाहिद्दीन आलम यांनी या ठिकाणी पंचर दुरुस्त करण्याचे दुकान टाकले आहे. याच दुकानात हा दुर्दैवी प्रकार घडला. मोहम्मद आलम यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. या फिर्यादीत म्हटल्यानुसार, शिवाजी लक्ष्मण सुळे (वय २३) रा. शिंदे नगर मोहाडी ता. धुळे व रोहित राजू चंद्रवंशी (वय २३) रा. लळींग ता.धुळे या दोघांनी संगनमताने मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (वय १४) रा. सुकासन बारोयारी जि. कटीयार था. सिमापूर बिहार या बालकाला काही कारण नसतांना टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसर पाईपच्या सहाय्याने दुखापत करण्यात आली. शिवाजी सुळे याने खालीक यास पकडून रोहीत चंद्रवंशी याने त्याची पॅन्ट काढली व टायर पंक्चर दुकानासमोर ठेवलेल्या कॉम्प्रेसर यंत्राचा कॉक चालू करुन हवेचा पाईप खालीक याच्या गुदव्दारास लावला. यामुळे खालीकच्या पोटात वेगाने हवा शिरली. व पोटातील अवयवांना गंभीर दुखापत झाली. यात खालील याचा मृत्यू झाला. या फिर्यादीवरुन मोहाडी पोलिसांनी सुळे व चंद्रवंशी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा :

जळगाव: रशिया येथे नदीत बुडालेल्या अमळनेरच्या भावाबहिणीचे मृतदेह सापडले
बापचं बनला वैरी: तीन वर्षाच्या चिमुरडीचा डोक्यात काठी घालून खून
गडचिरोली: कोरची तालुक्यात हिवतापाचा उद्रेक सुरुच; आणखी एका बालिकेचा मृत्यू