नांदेड : चॉकलेटचे अमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक

नांदेड : चॉकलेटचे अमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक

नायगाव बाजार; Bharat Live News Media वृत्तसेवा:  पाच वर्षांच्या चिमुरडीला चाॅकलेटचे अमिष दाखवून दुकानात अत्याचार करणा-या नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. नायगाव तालुक्यातील मरवाळी परिसरात गुरुवारी (दि.६) ही  घटना घडली होती. याप्रकरणी  महेबुब उर्फ सोहेल मुस्तपा शेख असे या नराधमाला शनिवारी (दि.८) ताब्यात घेण्यात आले.
नायगावातील मरवाळी येथील महेबुब शेख याच्या दुकानात निरमा पुडा घेण्यासाठी पाच वर्षीय चिमुरडी आली होती. यावेळी तिला चाॅकलेट देतो, म्हणून या नराधमाने दुकानाच्या आत बोलवले. व तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने या घटनेबद्दल नातेवाईकांना सांगितले. चिमुरडीचे वडील बाहेरगावी असल्याने चिमुरडीच्या कुटुंबियांनी शनिवारी (दि.८) नायगांव पोलिस ठाण्यात धाव घेतली. चिमुरडीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार महेबुब शेख या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा :

धक्कादायक! धुळ्यात गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू; दोघांना अटक
जळगाव: रशिया येथे नदीत बुडालेल्या अमळनेरच्या भावाबहिणीचे मृतदेह सापडले
खिद्रापुरात प्रेमविवाह उधळला; मुलीच्या वडिलांचा रुद्रावतार पाहून नवरदेव पळाला