मोठी बातमी : इस्रायलने मध्‍य गाझातून केली चार ओलिस नागरिकांची सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझा पट्टीतून विशेष मोहिम राबवून सुटका करण्‍यात आल्‍याची माहिती इस्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. नोआ अर्गामनी (वय २५), अल्मोग मीर जान (२१), आंद्रे कोझलोव्ह (२७) आणि स्लोमी झिव्ह (४०) अशी सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहे. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासच्या इस्‍त्रायलवर हल्‍ला केला …

मोठी बातमी : इस्रायलने मध्‍य गाझातून केली चार ओलिस नागरिकांची सुटका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझा पट्टीतून विशेष मोहिम राबवून सुटका करण्‍यात आल्‍याची माहिती इस्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
नोआ अर्गामनी (वय २५), अल्मोग मीर जान (२१), आंद्रे कोझलोव्ह (२७) आणि स्लोमी झिव्ह (४०) अशी सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहे. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासच्या इस्‍त्रायलवर हल्‍ला केला होता. यावेळी या चौघांचे अपहणर करण्‍यात आले होते, असे वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

Live update: IDF rescues 4 hostages alive in stunning operation in central Gaza https://t.co/RbQEZSfzoL
— ToI ALERTS (@TOIAlerts) June 8, 2024

ओलिसांच्‍या सुटकेसाठी इस्रायल पोलिसांनी नुसीरतच्या मध्यभागी असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून विशेष शोध मोहिम राबवली. चार ओलिसांची सुटका करण्‍यात यश मिळाले. त्‍यांच प्रकृती चांगली आहे. त्‍यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ‘शेबा’ टेल-हाशोमर मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

Noa Argamani (25), Almog Meir Jan (21), Andrey Kozlov (27), and Shlomi Ziv (40) were rescued in a special operation by the IDF, ISA and Israel Police from 2 separate locations in the heart of Nuseirat after being kidnapped by Hamas from the Nova music festival.
They are in good… pic.twitter.com/PnkjL4GRQz
— Israel Defense Forces (@IDF) June 8, 2024

७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्‍या हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलने दिलेल्‍या प्रत्‍युत्तर आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत.
इस्‍त्रायलच्‍या विशेष शोध मोहिमेत शिन बेट आणि यमाम ब्रिगेडने नुसरतमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओलिसांची सुटका केली, असे जेरुसलेम पोस्टने वृत्त दिले आहे. ओलिसांची प्रकृती चांगली असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना शेबा मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.