NEET परीक्षेसंदर्भात NTA प्रमुखांचा मोठा खुलासा, म्‍हणाले…

NEET परीक्षेसंदर्भात NTA प्रमुखांचा मोठा खुलासा, म्‍हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या महिन्यात घेण्यात आलेली NEET परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी विराेधी पक्षाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. निकालामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे (NEET UG 2024 exam result) म्हटले आहे.
देशातील 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर 5 मे रोजी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा (NEET-UG) घेण्यात आली. यानंतर गुण वाढल्यामुळे विक्रमी 67 उमेदवारांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले आहेत. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी शनिवारी कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्टीकरण (NEET UG 2024 exam result) दिले.
पत्रकार परिषदेत एनटीए प्रमुखांनी सांगितले की, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गोष्टींचे विश्लेषण केले.  ही समस्या फक्त सहा परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित आहे”, NEET उमेदवारांच्या निकालात ग्रेस गुण मिळू शकतात आणि शिक्षण मंत्रालयाने 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल पुन्हा तपासण्यासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही (NEET UG 2024 exam result), असे त्यांनी स्पष्ट केले.

#WATCH | Delhi: NTA DG Subodh Kumar Singh says, “NEET exam was held on 5 May…The results were out on 4th June…The grievances of students were addressed through a press release on 6th June…”
On the increase in toppers he says, “The ambiguity in a question of physics was… pic.twitter.com/lLYEGAyCnL
— ANI (@ANI) June 8, 2024
 
सर्व गोष्टींचे पारदर्शकपणे विश्लेषण करुनच  निकाल जाहीर
“आम्ही सर्व गोष्टींचे पारदर्शकपणे विश्लेषण करुनच  निकाल जाहीर केला आहे. 4,750 परीक्षा केंद्रांपैकी, ही समस्या सहा केंद्रांपुरती मर्यादित होती आणि 24 लाख उमेदवारांपैकी केवळ 1,600 उमेदवारांना याचा फटका बसला आहे. देशभरातील या परीक्षेच्या अखंडतेशी कोणती ही तडजोड होणार नाही. आम्ही आमच्या प्रणालीचे विश्लेषण केले आणि पेपर लीक झाला नाही.” असेही एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले आहे.