कंगना थप्पड केस : ‘त्या’ महिलेला १ लाख देण्याची घोषणा करणारा कोण आहे?

कंगना थप्पड केस : ‘त्या’ महिलेला १ लाख देण्याची घोषणा करणारा कोण आहे?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचीत खासदार कंगना रनौत यांना चंदिगड विमानतळावरून दिल्लीची फ्लाईट पकडताना सिक्युरिटी चेक दरम्यान एका महिला कॉन्स्टेबलने तिला जोरदार थप्पड मारले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कंगना रनौतला थप्पड मारणारी महिला कॉन्स्टेबलने सांगितलं की, शेतकरी आंदोलनात चुकीचे वक्तव्य केल्याने तिने हे पाऊल उचललं होतं. आता महिला गार्डचे निलंबन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर लोक नेटकरी वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत.
अधिक वाचा-

Hamare Baarah Movie : कर्नाटक सरकारने घातली ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी; जाणून घ्या कारणे….

दरम्यान, एका बिझनेसमनने जाहिर घोषणा केली आहे की, कंगना रनौतला ज्या महिलेने थप्पड मारलं होतं, तर त्या महिलेला बक्षीस म्हणून एक लाख रुपये देणार. हा व्यक्ती पंजाबच्या मोहाली राहणारा आहे. त्याचे नाव शिवराज सिंह बैंस ससांगितलं जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून या महिलेला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

Kangana Ranaut : नोकरी लावतो; विशालने कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISFला दिलं आश्वासन

बिझनेसमन शिवराज सिंह बैंसने व्हिडिओ शेअर करून म्हटले की, ‘मैं कंगना रनौतला थप्पड मारणारी महिला शिपाईला सलाम करतो. तिने पंजाब आणि पंजाबियत वाचवण्यासाठी असे केले. मी त्यांना बक्षीस म्हणून एक लाख रुपये देईन.’ शिवराज सिंह बैंसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अधिक वाचा-

कंगना रनौत यांना थप्पड लगावल्यानंतर काय म्हणाला CISF गार्डचा भाऊ?

याप्रकरणी कंगना रनौतने व्हिडिओ शेअर करून म्हटलं होतं की, सिक्युरिटी चेक वेळी महिलेने ना केवळ थप्पड मारलं होतं तर शिवीगाळदेखील केली होती. सूत्रांनुसार, १५ वर्षांपासून ती नोकरी करत आहे.