पालघरमधून भाजपचे डॉ. हेमंत सवरा विजयी
पालघर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची अपेक्षा फोल ठरवत महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडी आणि बविआचे मनसुबे उधळून लावले. सवरा यांनी सुमारे १ लाख ८४ हजार ४२२ मतांचे मताधिक्य घेत महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांच्यावर विजय मिळवला.
बविआचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांची शेवटच्या फेरीपर्यंत अडीच लाख मतांचा टप्पा गाठताना दमछाक झाली. विजय मिळवल्यानंतर भाजप आणि महायुतीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेढे भरवून डॉ. हेमंत सवरा यांचे अभिनंदन केले. राज्यात महायुतीची पिछेहाट झाल्याने भाजपच्या विजयाचा उत्साह मात्र कमी होता.
हेही वाचा :
भाजपाने अकोला लोकसभेचा गड राखला! अनुप धोत्रे विजयी
मोहिते-पाटलांची विजयाकडे वाटचाल; १६ व्या फेरीत ६२ हजारांचे मताधिक्य