अकोला: अनुप धोत्रे विजयी; अभय पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पराभव
अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा: अकोला लोकसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी 40 हजारा च्या वर मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा पराभव केला आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अँड . प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.लोकसभा मतदार संघाच्या 27 व्या फेरीनंतर अनुप धोत्रे यांनी40 हजार 12 मत घेत विजय निश्चित केला.
पंधराव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे अभय पाटील सातत्याने पुढे होते .मात्र त्यानंतरच्या मतमोजणीच्या फेरीमध्ये भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे सातत्याने मतांमध्ये पुढे राहिले .भाजपाचे अनुप धोत्रे यांना 45 38 66तर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटीलयांना41 38 54 आणि वंचित बहुजन आघाडीचे अँड प्रकाश आंबेडकर यांना 27 48 23एवढी मते प्राप्त झालीभाजपाने पुन्हा आपला गड राखला आहे. गत चार लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार संजय धोत्रे हे सातत्याने विजयी झालेले आहेत.
तर या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी बाजी मारत विरोधकांना पराभूत केले आहे. अकोला लोकसभा मतदार संघात या निवडणुकीत कॉंग्रेसने परिवर्तनावर जोर देत प्रचार केला होता. मात्र, या मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा भाजप कौल दिला आहे.
हेही वाचा
Bhandara-Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया मतदारसंघावर २५ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा
Lok sabha Election Result : धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव 5155 मतांनी आघाडीवर
नितीन गडकरींची हॅटट्रिक; नागपुरात विजयी घोडदौड, आनंदोत्सव सुरू