चंद्राबाबू नायडू रविवारी घेणार आंध्र प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची शपथ

चंद्राबाबू नायडू रविवारी घेणार आंध्र प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची शपथ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश विधानसभेत मोठा विजय मिळवला आहे. विधानसभेच्‍या १७५ जागांपैकी तब्‍बल १३० जागांवर तेलुगू देसम पार्टीने निर्णायक आघाडी घेतली आहे. चंद्राबाबू नायडू 9 जून रोजी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी)चा पराभव झाला आहे. जगन रेड्डी राज्यपाल एस अब्दुल नजीर यांच्याकडे राजीनामा सादर करण्‍याची शक्‍यता आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यशानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी त्‍यांचे अभिनंदन केले.
तेलगू देसम पार्टीने विधानसभेच्‍या १४४ तर लोकसभेच्‍या १७ जागांवर निवडणूक लढवली होती. राज्‍यात भाजपने सहा लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. तर अभिनेते पवन कल्‍याण यांच्‍या जनसेना पक्षाने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागा लढवल्या होत्‍या.