बीडमध्ये पंकजा मुंडे – बजरंग सोनवणे यांच्यात काटे की टक्कर
बीड: Bharat Live News Media वृत्तसेवा: बीड लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. मतमोजणी पहिल्या फेरी पासून बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे यांची आघाडी ८ हजार मतांपेक्षा अधिक होती. दरम्यान, सहाव्या फेरीत पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांची आघाडी कमी करण्यात यश मिळवले. सातव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे यांना केवळ दोनशे मतांची लीड होते. तर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी ७ हजारांची लीड घेतली आहे. आगामी फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे हे लीड कायम ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.