ब्रेकिंग| देशातील पहिला निकाल समोर, प्रज्वल रेवण्णा पराभूत

ब्रेकिंग| देशातील पहिला निकाल समोर, प्रज्वल रेवण्णा पराभूत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लाेकसभा निवडणुकीत देशातील पहिला निकाल कर्नाटकातून समोर आला आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस)चे  नेते प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे.  हसन लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे विजयी झाले आहेत.
16 वी फेरी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात 41,782 मतांनी आघाडीवर आहेत. श्रेयसला 6,12,448 मते मिळाली, तर प्रज्वलला 5,70,666 मते मिळाली आहेत.
हासन मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांना लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आली आहे.  रेवण्णा यांना  6 जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्‍यात आली आहे.