कोल्हापुरात भरधाव कारने 7 जणांना चिरडले, 3 ठार (Video)

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंत्यत गजबजलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी २.२५ वा. भीषण घपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधार सँन्ट्रो कारने सात जणांना चिरडले. यात तीन दुचाकींना उडविले. दुचाकीवरील एक युवक फुटबॉलसारखा उडून सुमारे ५० फूटावर जाऊन पडला. अपघातात चालकासह तिघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाले. घटनेने सायबर चौकासह मयतांचा समावेश असलेले …

कोल्हापुरात भरधाव कारने 7 जणांना चिरडले, 3 ठार (Video)

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील अंत्यत गजबजलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी २.२५ वा. भीषण घपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधार सँन्ट्रो कारने सात जणांना चिरडले. यात तीन दुचाकींना उडविले. दुचाकीवरील एक युवक फुटबॉलसारखा उडून सुमारे ५० फूटावर जाऊन पडला. अपघातात चालकासह तिघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाले. घटनेने सायबर चौकासह मयतांचा समावेश असलेले दौलतनगर हादरून गेले. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.
चालक वसंत मारूती चव्हाण (वय ७४, रा. प्लॉट नं. ७४, वैभव हौसिंग सोसायटी, शाहू नाका, कोल्हापूर), हर्षद सचिन पाटील (वय १६, रा. दौलतनगर) व अन्य एक अनोळखी यांचा समावेश आहे. धनाजी शंकर कोळी (वय ४४) आणि त्यांची पत्नी शुभांगी धनाजी कोळी (वय ३८, दोघेही रा. कणेरीवाडी, ता. करवीर) व त्यांचा नातू समर्थ पंकज पाटील (वय १ वर्ष), मयूर मारूती खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) आदी जखमी झाले आहेत. जखमींवर सीपीआरसह इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनस्थळी आणि सीपीआर व खासगी हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख जयश्री देसाई यांच्यासह इतर पोलिस अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
चालक चव्हाण हे सोमवारी दुपारी सॅन्ट्रो (क्र. एम. एच. ०९ बी एम २८९२) कारने शिवाजी विद्यापीठ मार्गे राजारामपुरीकडे जात होते. त्यावेळी सायबर चौकातील सिग्नल बंद होता. सायबर चौकाच्या अलिकडे चव्हाण यांचा कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चव्हाण यांची कार अत्यंत वेगाने धाऊ लागली. चौकात दुचाकींची मोठी गर्दी होती. तसेच दुपारची वेळ असल्याने सायबर आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, नागरीक पायी ये-जा करत होते. सायबर चौकातील सिग्नलजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून उडून चव्हाण यांची कार काही सेंकदात भरधाव गेली. कारने तीन दुचाकींना उडविले.
कारच्या धडकेत दुचाकीवरील काहीजण उडून इतरत्र रस्त्यावर पडले. हर्षद पाटील हा तर तब्बल ५० फूट लांब उडून पडला. सायबर चौकातील राजारामपुरीकडे जाणा-या रस्त्यावर डाव्या बाजूला असलेल्या सिग्नलचा खांब आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीम (पी. ए. एस.) च्या खांबाला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही खांब काँक्रीटमधून निखळून तुटले. दोन्ही खांबाला धडक दिल्यानंतर कार थांबली आणि त्याच ठिकाणी पलटी झाली.
कारने सिग्नलच्या खांबाला धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला. तसेच अपघातामुळे इतर दुचाकीस्वारांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी धावले. इतर वाहनचालकांनी थांबून मदतकार्य सुरू केले. ॲम्ब्युलन्स बोलविण्यात आली. तोपर्यंत पोलिस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांच्यासह इतर तरूणांनी जखमींना टेम्पो, रिक्षासह इतर वाहनांतून सीपीआर आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अपघात झालेली सॅन्ट्रो कार आणि दुचाकी हलविल्या.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shekhar Patil (@shekhar_patil75)