जालना: जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा विरोध

जालना, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मंगळवार (दि.४) पासून उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी (दि.३) केली. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट २०२३ …

जालना: जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा विरोध

जालना, Bharat Live News Media वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मंगळवार (दि.४) पासून उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी (दि.३) केली.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी विविध प्रकारचे आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला गावातील सर्वच जाती-धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे गावामध्ये अनेक नेत्यांचा वावर वाढला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक आले होते. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत होता. परंतु, आता या आंदोलनाचा विषय भरकटत चालला आहे. त्यामुळे गावामध्ये जातीभेद, आपापसात द्वेष, भीतीचे वातावरण, एक दुसर्‍यांचा तिटकारा सुरू झाला आहे.
एवढेच नव्हे तर मंदिराच्या बाजूलाच हे आंदोलन सुरू असल्यामुळे महिला वर्ग देखील या मंदिरात येण्यास धजावत नाही. त्यामुळे या आंदोलनाला आता पुढील परवानगी देऊ नये, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा 

जालना पोलिसांनी जप्त केला 1 कोटी 10 हजारांचा मुद्देमाल
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच
अंतरवाली सराटीत ४ जूनपासून बेमुदत उपोषणाचा मनोज जरांगे यांचा निर्धार