निरा देवघर, भाटघर परिसरात काजवा महोत्सवास प्रारंभ; जाणून घ्या आयोजन

भोर : पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या काळोखात अन् चांदण्यांच्या मंद प्रकाशात झाडा-झुडुपांवर लक्षावधी काजव्यांच्या लखलखाटाचे मनोहारी दृश्य आता निसर्गप्रेमींना मनाच्या कुपीत साठवून ठेवता येणार आहे. भोर तालुक्यातील निरा-देवघर आणि भाटघर धरण परिसरात चमकणार्‍या, लुकलुकणार्‍या काजव्यांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील हौशी निसर्गप्रेमी पर्यटकांना काजवे बघता यावेत आणि रात्रीच्या निसर्गाचा अनुभव घेता …

निरा देवघर, भाटघर परिसरात काजवा महोत्सवास प्रारंभ; जाणून घ्या आयोजन

भोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : रात्रीच्या काळोखात अन् चांदण्यांच्या मंद प्रकाशात झाडा-झुडुपांवर लक्षावधी काजव्यांच्या लखलखाटाचे मनोहारी दृश्य आता निसर्गप्रेमींना मनाच्या कुपीत साठवून ठेवता येणार आहे. भोर तालुक्यातील निरा-देवघर आणि भाटघर धरण परिसरात चमकणार्‍या, लुकलुकणार्‍या काजव्यांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे.
मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील हौशी निसर्गप्रेमी पर्यटकांना काजवे बघता यावेत आणि रात्रीच्या निसर्गाचा अनुभव घेता यावा यासाठी भोरमधील संस्थांनी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (1 जून ते 15 जून) निरा-देवघर परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. भोरमधील सह्याद्री सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू फोर्स, रवी सोहम दत्त प्रतिष्ठान आणि आम्ही भोरकर प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटकांना मोफत मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे.
डोळ्यांना सुखावणारी प्रकाशफुले
काजव्यांची झाडांवर काही क्षणाची का होईना वस्ती असते, ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष-लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. निसर्गप्रेमी हे कुतूहलमिश्रित आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभवाचा अनुभव घेतात.
येथे पाहा अद्भूत दुनिया
निरा-देवघर धरण खोर्‍यातील निगुडघर, साळव, रायरी, कंकवाडी, दापकेघर, गुढे, निवंगुण व दुर्गाडी या गावांच्या परिसरात काजव्यांची दुनिया मोठ्या प्रमाणात अवतरते. रायरेश्वरच्या पायथ्याशी वसलेल्या या गावांच्या परिसरातील झाडा-झुडुपांवर लक्षावधी काजव्यांचा लखलखाट दिसतो. या परिसरात हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर आणि बांबू अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भूत खेळ पाहावयास मिळतो.
निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाचे मुद्दे
भोरमधील संस्थांच्या मदतीने पुण्या-मुंबईमधील निसर्गप्रेमींना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दररोज रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत पर्यटकांना माहिती दिली जाणार आहे. तसेच पर्यटकांनी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून वेळ निश्चित करून घ्यावी लागणार आहे. पर्यटकांना प्रवासासाठी स्वतःचे वाहन घेऊन जावे लागणार आहे. शिवाय अंगावर सुरक्षित कपडे, बूट घालून हातामध्ये एक बॅटरी (टॉर्च) ही काळजी घेणे आवश्यक आहे. काजवे पाहायला जाणार त्या ठिकाणाची खडा-न्-खडा माहिती घ्यावी. अनोळखी ठिकाणी काजवे पाहायला जाणे टाळावे. अकारण मोठाले टॉर्च लावू नये. काजवे ज्या ठिकाणी असतील त्यापासून वाहने 500 मीटर अंतरावर उभी करावीत. आरडाओरडा अजिबात करू नये. शांतपणे काजवे पाहावेत व आपल्या वाहनाच्या दिशेने टॉर्च न लावता निघून जावे.
भोर शहरापासून 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वरील गावांच्या हद्दीतील काजवे पाहण्याची सुवर्णसंधी आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण, घाण किंवा प्लास्टिकचा कचरा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच डोंगरांमधील वन्यप्राण्यांपासून सावध राहून त्यांना इजा होणार नाही, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
– सचिन देशमुख, सह्याद्री सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू फोर्स, संचालक

हेही वाचा 

pune porsche accident : अपघातादिवशी मद्य प्यायल्याची अल्पवयीन मुलाची कबुली
प्राचीन मंदिरांचे संवर्धन, संगोपण गरजेचे : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव
Good News ! मान्सून येत्या 48 तासांत राज्यात; आज कर्नाटक,आंध्र प्रदेशात प्रवेश