लोकसभा निवडणुकीचा स्पॉटलाईट आज 94.3 टोमॅटो एफएमवर

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली. निवडणुकीचा निकालही अगदी जवळ आला आहे. ही लोकसभा निवडणूक ज्यांनी प्रचारातून, कामातून जवळून अनुभवली त्या लोकप्रतिनिधींच्या नजरेतून नेमकं काय दिसलं हे श्रोत्यांना रविवारी ऐकता येणार आहे. 94.3 टोमॅटो एफएमवर रविवारी (दि.2) स्पॉटलाईट हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
रविवारी सकाळी 8 ते 12 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे आणि माजी खासदार राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील मुद्दे, कोल्हापूरच्या प्रश्नांवर सखोल चर्चा या आणि अशा इतर बाबींवर प्रकाश टाकणार्या स्पॉटलाईट कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
