जळगाव : एमपीडीए अंतर्गत तिघांवर स्थानबद्दची कारवाई
जळगाव– जिल्हयातील रामानंदनगर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन व अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील ०३ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत स्थानबध्दची कारवाई करण्यात आलेली आहे.
रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक बाजू कोळी वय ३६ रा. साईबाबा मंदिर जवळ समतानगर, जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०९ गुन्हे दाखल आहेत. रामानंदनगर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक, राजेंद्र कुटे यांनी प्रस्ताव दिला. त्यानुसार त्यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
एमआयडीसी पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम भुषण ऊर्फ भासा विजय माळी वय २४ रा.भुई काटयाच्या मागे तुकाराम वाडी जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी याच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर जि. कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले.
अमळनेर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख वय २४ रा. पिंपळे रोड संविधान चौक लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत २७ गुन्हे दाखल आहेत. अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तयार करून सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि. ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.