पीसी चाको बनले ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’चे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पीसी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर राजीव झा यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड केली आहे. पी.सी. चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. अडचणींचा हवाला देत 10 मार्च 2021 …
पीसी चाको बनले ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’चे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पीसी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर राजीव झा यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड केली आहे.
पी.सी. चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. अडचणींचा हवाला देत 10 मार्च 2021 रोजी राजीनामा देईपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते. चाको यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि पक्षात विविध पदे भूषवली आहेत. नंतर ते 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्ये सामील झाले आणि सध्या ते NCP च्या केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून काम करतात.
पीसी चाको कोण आहे?
केरळ विद्यापीठातून बॅचलरची पदवी घेतलेल्या पीसी चाको यांचा जन्म केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात झाला. ते केरळ विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. 1980 मध्ये, चाको पहिल्यांदा केरळ विधानसभेवर पिरावोम मतदार संघामधून निवडून आले. ते ई.के. नायर यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. 2-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे ते अध्यक्षही राहिले आहेत.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार श्री.पी.सी.चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय-धोरणे… pic.twitter.com/TDtqtHMYhn
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 1, 2024

Go to Source