माझ्‍यासाठी गर्लफ्रेंड कधी शाेधणार? तरुणाला दिल्‍ली पाेलिसांचे भन्‍नाट उत्तर…

माझ्‍यासाठी गर्लफ्रेंड कधी शाेधणार? तरुणाला दिल्‍ली पाेलिसांचे भन्‍नाट उत्तर…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलीस सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्ली पोलीस वेळोवेळी लोकांना जागरूक करण्याचे काम करत असतात. ‘जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन’ निमित्त दिल्ली पोलिसांची एक जनजागृती पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टवर एका तरुणाने केलेल्‍या कमेंटवर दिल्‍ली पाेलिसांनी दिलेले उत्तर साेशल मीडियावर तुफान व्‍हायरल हाेत आहे.
माझ्‍यासाठी गर्लफ्रेंड कधी शोधणार?
लोकांना जागरूक करण्यासाठी आणि तंबाखूपासून दूर राहण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ‘जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन’ निमित्त दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली होती. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये शिवम भारद्वाजने लिहिले की  ‘माझ्‍यासाठी गर्लफ्रेंड कधी शोधणार? मी आता सिंगल आहे. हे बरोबर नाही, तुम्हाला मला गर्लफ्रेंड शोधण्यात मदत करावी लागेल.”
तुम्ही ‘सिग्नल’ असाल, तर…
यातील गंमत म्हणजे कमेंट करताना शिवम भारद्वाजने सिंगल ऐवजी सिग्नल लिहिले. त्‍याच्‍या या कमेंटला  उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी लिहिले,”सर, तुमच्या गर्लफ्रेंडला शोधण्यात आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू (ती कधी बेपत्ता झाली तरच). टीप: जर तुम्ही ‘सिग्नल’ असाल, तर तुम्ही लाल नसून हिरवे  राहावे, अशी आमची अपेक्षा आहे.’ दिल्ली पोलिसांचे हे उत्तर व्हायरल होत असून लोकांना ते खूप आवडले आहे. यावर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दिल्ली पोलिसांचे X वर 1 दशलक्ष आणि इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Go to Source