इराणमध्ये पाच दिवसांचा दुखवटा जाहीर, हंगामी राष्ट्राध्यक्षपदी मोखबर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची हंगामी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मोखबर यांच्याकडे अंतरिम पदभार सोपवला.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, इराणच्या घटनेतील कलम 131 नुसार मोखबर यांची हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहम्मद मोखबर यांना पुढील ५० दिवसांच्या आत राष्ट्रपती निवडणुकीची तयारी करण्यासाठी न्यायिक प्रमुखांसोबत काम करावे लागेल.
अली बघेरी कार्यवाहक परराष्ट्र मंत्री
हेलिकॉप्टर अपघातात परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्या मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च आण्विक वार्ताकार अली बगेरी यांना कार्यवाहक परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
इराणमध्ये पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
इराणचे राष्ट्राध्यक्ष राईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुलाहियानी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पूर्व अझरबैजान प्रांतातील घनदाट जंगलात कोसळले.. या दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष रईंसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजानचे गव्हर्नर मलेक रहमाती यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला. इराणमध्ये पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
#BREAKING
Leader of the Islamic Revolution Ayatollah Seyed Ali Khamenei declared five days of national mourning following the martyrdom of President #Raisi and his entourage. pic.twitter.com/hdf8DUCXrb
— Tehran Times (@TehranTimes79) May 20, 2024
कोण आहेत मोहम्मद मोखबर ?
मोखबर यांचा जन्म १ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. ते राईसी यांच्याप्रमाणेच इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या जवळचे मानले जातात.२०२१ मध्ये इब्राहिम रईसी राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर मोखबर हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले हाेते. ऑक्टोबरमध्ये मॉस्कोला भेट देणाऱ्या समितीमध्ये त्यांचा सहभाग ते सिना बँकेच्या बोर्डाचे अध्यक्ष आणि खुजेस्तान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांच्याकडे दोन डॉक्टरेट पदव्या आहेत.
हेही वाचा :
Iran President Ebrahim Raisi | इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह ९ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
Iran President Death | इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमागे ‘इस्त्रायल’चा हात? संशयाची सुई ‘मोसाद’कडे
Iran President : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली