Bharat Live News Media ऑनालईन डेस्क : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या पोस्टरमधील कार्तिकचा लूक पाहून चाहते भारावून गेलं. यानंतर त्याच्या धमाकेदार ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून अखेर ‘चंदू चॅम्पियन’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
‘चंदू चॅम्पियन’चा ट्रेलर रिलीज
‘१९६५ च्या युद्धात त्याला ९ गोळ्या लागल्या होत्या…’ असे बोलताना ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. यात चंदू चॅम्पियनच्या कथेच्या त्या पानापासून सुरूवात झाली होती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लहानपणापासूनच चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुरलीकांतचे सुवर्णपदक विजेत्याकडून आर्मी ऑफिसरमध्ये कसे रूपांतर झाले याची कथा यात दाखविण्यात आली आहे. या काळात अनेक व्यक्ती त्याला चंदूला चॅम्पियन म्हणत खिल्ली उडवत असतात, मात्र, त्याकडे लक्ष न देता त्याने देशासाठी पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
त्याच्या वडिलांना हे अजिबात आवडत नसल्याचे दाखविले पण, मुरलीकांतना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात कुस्तीपासून केली. ‘चंदू नाही, मी चॅम्पियन आहे.’ मुरलीकांतच्या भूमिकेत कार्तिक आर्यनचा हा संवाद आहे. ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी कार्तिक आर्यनला आधी सैन्यात भरती व्हावे लागले. यासह त्याला बॉक्सिंगमध्ये प्रगती करण्याची संधी मिळाली. पण तेथेही त्याचं आयुष्य सुरळीत झालं नाही. असेही दाखविले आहे.
१९६५ च्या युद्धात ९ गोळ्या लागल्या तरीही…
१९६५ च्या युद्धात ९ गोळ्या लागल्याने मुरलीकांत कोमात गेला होता. जेव्हा तो कोमातून बाहेर आला तेव्हा त्याला त्याची स्वप्ने पूर्ण करणे कठीण वाटले, परंतु, त्याने हार मानली नाही. तो पुन्हा उभा राहिला आणि शेवटपर्यत लढला. शेवटी त्याला एक अशी वेळ आहे की, त्याला प्रत्येक चंदूसाठी लढायचे होते. ज्याला चॅम्पियन बनायचे स्वप्न उराशी बाळगले होते.
कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित या चित्रपटात कार्तिक आर्यन सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे कार्तिकने त्याच्या गावी ग्वाल्हेरमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. हा चित्रपट १४ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
कोण आहे मुरलीकांत पेटकर?
मुरलीकांत पेटकर हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. त्याने ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत ३७. ३३ सेकंदांचा विश्वविक्रम केला होता. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. केवळ बॉक्सिंगमध्येच नाही तर पोहणे, टेबल टेनिससारख्या खेळांमध्येही त्याला रस होता.
हेही वाचा
मातृभाषेची लाज वाटते का?; कियारा कान्समध्ये इंग्रजी बोलताच नेटकऱ्यांनी घेतला क्लास
Aditi Rao Hydari : घटस्फोटानंतर दुसरं लग्न कधी करणार?; ‘हिरामंडी’च्या ‘बिब्बो जान’च्या वॉकची जोरदार चर्चा
तू मला मिळालीस धन्य झालो…; कुशालने पोस्ट करत रिलेशन केलं कंन्फर्म
View this post on Instagram
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)