कुत्रे भुंकल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाळीव कुत्रे भुंकल्याच्या रागातून फाळकुट गुंडांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कुणाल संजय माने (वय 33, रा. रंकाळा स्टॅण्ड परिसर, कोल्हापूर) हा तरुण जखमी झाला. मुख्य संशयित राजू शेळके, अभी मेवेकरी यांच्यासह सहा अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाले आहेत. टोळीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल …

कुत्रे भुंकल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पाळीव कुत्रे भुंकल्याच्या रागातून फाळकुट गुंडांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कुणाल संजय माने (वय 33, रा. रंकाळा स्टॅण्ड परिसर, कोल्हापूर) हा तरुण जखमी झाला. मुख्य संशयित राजू शेळके, अभी मेवेकरी यांच्यासह सहा अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाले आहेत. टोळीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोरांच्या अटकेसाठी जुना राजवाडा पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
फिर्यादी कुणाल माने हे मंगळवारी (दि. 14) रात्री त्यांच्या पाळीव कुत्र्याला घराभोवताली फिरवत होते. याच सुमाराला रंकाळा स्टॅण्ड परिसरात एका बाजूने जाणार्‍या संशयितांपासून काही अंतरावर पाळीव कुत्रे भुंकले. आमच्या दिशेने पाहून कुत्रे का भुंकले, असा जाब विचारत संशयितांनी माने यांना घेरले. वादावादी सुरू असतानाच शेळके, मेवेकरी यांनी साथीदारांना बोलावून घेतले.
अन्य साथीदार माने यांना मारहाण करीत असतानाच मेवेकरी, शेळके याने स्वत:जवळील चाकू काढला. कुणाल यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. त्यात कुणाल माने जखमी झाले. कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी या घटनेची दखल घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या आहेत. हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.