रहस्यमयी नव्या विश्वात तब्बूची एन्ट्री, ‘दून: प्रोफेसी’ टीजर पाहाच

रहस्यमयी नव्या विश्वात तब्बूची एन्ट्री, ‘दून: प्रोफेसी’ टीजर पाहाच

नुकताच समजले आहे की, तब्बू “दून: प्रोफेसी”मध्ये अभिनय साकारेल. आता निर्मात्यांनी दीर्घकाळानंतर मॅक्स सीरीजचा पहिला टीजर जारी केला आहे. तब्बू पुन्हा एक हॉलीवूड प्रोजेक्ट करायला जात आहे. ऑस्कर विनिंग चित्रपट फ्रेंचायजी ‘ड्यून’ च्या प्रीक्वलमध्ये तब्बू दिसणार आहे. याआधी तिने हॉलीवूडमध्ये दोन प्रोजेक्ट्स ‘द नेमसेक’ आणि ‘लाईफ ऑफ पाय’ मध्ये काम केलं आहे.
कोणती भूमिका साकारणार तब्बू
एका रिपोर्टनुसार, तब्बूला स्ट्रीमिंग प्लॅटफार्म मॅक्ससाठी तयार होत असलेला चित्रपट ‘ड्यून’ची प्रीक्वल सीरीज ‘ड्यून: प्रोफेसी’ साठी कास्ट केलं गेलं आहे. या शोमध्ये ती सिस्टर फ्रेंचेस्काची भूमिका साकारणार आहे.’
याआधीही ऑस्कर विनिंग प्रोजेक्टमध्ये तब्बू
तब्बूचा मागील हॉलीवूड प्रोजेक्ट ‘लाईफ ऑफ पाय’ (२०१२) होता. या चित्रपटामध्ये तब्बूसोबत इरफान खान, आदिल हुसैन आणि सूरज शर्मा यांनीदेखील काम केलं होतं. ४ ऑस्कर ॲवॉर्ड्स जिंकणारा हा चित्रपट फिल्म लव्हर्सच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.
तब्बूने ‘भूल भुलैया २’, ‘दृश्यम २’, ‘भोला’ आणि ‘क्रू’ मध्ये काम केलं आहे. आता तब्बू लवकरचं अजय देवगन सोबत ‘औरों में कहां दम था’ मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

हेदेखील वाचा – 

Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर Urvashi Rautela ने दीपिका पदुकोणला केलं कॉपी
कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलली
श्रेयस तळपदेने केलं पंतप्रधानांचं कौतुक; ‘नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, असं राजकीय वातावरण’