चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

वणी : Bharat Live News Media वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघातील वणी येथे बुधवारी (दि. १५) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पार पडलेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळयाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. तर वणी पोलिसांत याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा बुधवारी (दि. १५) रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान पार पडली. या सभेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आ. अनिल देशमुख, आ. रोहीत पवार, आ. सुनिल भुसारा यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सभेसाठी दिंडोरीसह लगतच्या सुरगाणा, कळवण, चांदवड, निफाड तालुक्यातून दहा हजारावर नागरिक उपस्थित होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास शरद पवार यांचे भाषण संपल्यानंतर कोडांजी रावबा आव्हाड (वय ७२वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस नाशिक जिल्हा अध्यक्ष, रा. प्लॉट नं. ५७ पुष्कर बिल्डीग रामदास गार्डन समोर कॅनडा कॉर्नर नाशिक) हे व्यासपीठावरुन उतरुन मैदानाबाहेर पडतांना असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोंडाजी आव्हाड यांच्या गळ्यातील गळ्यातील तब्बल ६ तोळेची सोन्याची चैन त्यामध्ये ओम पानचे पॅन्डल होते. असे सुमारे तीन लाख रूपायांंची सोन्याची चैन चोरट्याने नेली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत वणी पोलिसांत कोंडाजी आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:

Dune : Prophecy – रहस्यमयी नव्या विश्वात तब्बूची एन्ट्री, ‘दून: प्रोफेसी’ टीजर पाहाच
Ratnagiri News: खेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळले
Dhule Lok Sabha | मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करा : मुख्य निवडणूक अधिकारी