आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अंबाबाईच्या चरणी (Video)

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अंबाबाईच्या चरणी (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश माजी सीएम चंद्राबाबू नायडू यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. अंबाबाईच्या चरणी लीन होत त्यांनी सपत्नीक पंधरा मिनिटे पूजा केली. यावेळी नायडू दाम्पत्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्य़मांशी बोोलताना माजी सीएम चंद्राबाबू नायडू म्हणाले, मोदी इज व्हेरी गूड. देशामध्ये सध्या मोदी मूड असल्याचे त्यांनी नमूद केले. पण, आंध्र प्रदेशातील राजकारणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ४००+ जागा जिंकेल, असा नायडू यांनी केला.
यावेळी आंध्र प्रदेश राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

कोल्हापुर | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन#Kolhapur pic.twitter.com/0FWRziJcK3
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 16, 2024