सिमला ऑफिस चौक परिसरात वाहतुकीत बदल; असे आहेत बदल

सिमला ऑफिस चौक परिसरात वाहतुकीत बदल; असे आहेत बदल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने शुक्रवार (दि. 17) पासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. यादरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
असे आहेत बदल

 वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी, के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक, हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे.
 वीर चापेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार (पर्यायी मार्ग – चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने सर्व्हिस रस्त्यावरून चापेकर चौक – डावीकडे वळण घेऊन न. ता. वाडी – उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक)
 फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चापेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
 न. ता. वाडी चौक ते चापेकर चौक प्रवेश बंद राहील.
स. गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे प्रवेश बंद राहील.
 शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून येऊन एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
 सिमला ऑफिस चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणार्‍या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने जाऊन चापेकर उड्डाणपुलावरून जावे.
 वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

हेही वाचा

Nashik | कांदाप्रश्नी पंतप्रधान मोदींना भुजबळांचे साकडे
बँकांनी अडवली ऊसतोडणी यंत्रे; अनुदानापासून वंचित राहण्याचा धोका
पुण्यात होर्डिंगबाबत पालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर; कारवाईचे आदेश!