स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर हल्ला, PM मोदींनी व्यक्त केला निषेध

स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर हल्ला, PM मोदींनी व्यक्त केला निषेध

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फायको यांच्यावर बुधवार (दि.१६ मे) गोळीबार झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही या हल्‍ल्‍याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित हा 71 वर्षीय लेखक असल्याची माहिती समोर आल्याचे स्लोव्हाकियाच्या गृहमंत्र्यांनी बुधवारी (दि.१५) माध्यमांना सांगितले.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान फिको बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) हँडलोवा येथे झालेल्या गोळीबारात जखमी झाले. त्याच्यावर सध्या बांस्का बिस्ट्रिका शहरात उपचार सुरू आहेत.  हल्‍लेखाेराला घटनास्थळी अटक करण्यात आली. अमेरिकेनेही या हल्ल्याचा निषेध केला आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी फिकोला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
PM मोदींनी व्यक्त केला तीव्र शब्दात निषेध
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी या भ्याड हल्ला आणि घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान फिको लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. भारत स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या जनतेच्या पाठीशी उभा आहे.”

Prime Minister Narendra Modi tweets “Deeply shocked at the news of the shooting at Slovakia’s Prime Minister, Robert Fico. I strongly condemn this cowardly and dastardly act and wish PM Fico a speedy recovery. India stands in solidarity with the people of the Slovak Republic.” pic.twitter.com/7Zz4UulycR
— ANI (@ANI) May 16, 2024

“Cowardly and dastardly act”: PM Modi condemns attack on Slovak PM Fico, wishes him speedy recovery
Read @ANI Story | https://t.co/r6t91i1gKT#PMModi #NarendraModi #Slovak #RobertFico pic.twitter.com/8P0VRacYWF
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2024

हेही वाचा:

Indore Road Accident : इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, आठ ठार
भाजपच्या कामगिरीचे ‘पोस्टमार्टम’; कोअर कमिटी पाठवणार कामाचा अहवाल
पंजाबचा विजयी ‘चौकार’! सलग चौथ्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंता