धक्कादायक! कर्ज फेडण्यासाठी नातवानेच केली आजीची हत्या

धक्कादायक! कर्ज फेडण्यासाठी नातवानेच केली आजीची हत्या

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
कर्ज फेडण्यासाठी नातवाने आजीकडे पैसे मागितले. परंतु पैसे मागूनही आजी पैसे देत नसल्याने नातवाने तिचा खून करून पोत्यामध्ये भरून ठेवण्याची घटना बुधवारी (दि.१५) रोजी सायंकाळी उघडीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी ८० वर्षीय मांजाबाई दगडू भोई या राहतात. तिच्या राहत्या घरी तिला ठार करून पोत्यामध्ये बांधून ठेवले असल्याची घटना उघडकीस आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जावून पुढील तपासबाबत आदेश दिले होते. या प्रकरणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मयत मांजाबाई दगडू भोई तिच्या बहिणीचा नातू विशाल भोई याने हे कृत्य केल्याचे संशय असल्याचे समोर आले. संशयित आरोपी हा पाचोरा या ठिकाणी मयत यांच्या प्रेतासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील, दीपक आहिरे यांनी पाचोरा या ठिकाणी तपास केला. आरोपी विशाल प्रभाकर भाई (वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली.
आरोपी विशाल भोई यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेडण्याकरीता आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने नकार दिल्याने आजी मंजाबाई हिचा गळा दाबून तिला जिवेठार मारले. त्यानंतर तिच्या हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन घरातच ठेवले. त्यानंतर मागच्या दरवाज्याने बाहेर निघून मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि. संभाजीनगर येथे जावून एका सोनार दुकानावर दागिने मोडून त्याबदल्यात आलेले पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे आला. अशी गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आले आहे.