परभणी: जिंतूर येथे पैशाच्या वादातून चुलत भावाचा खून; दोघांना अटक

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील साठे नगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत एका ३६ वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली …

परभणी: जिंतूर येथे पैशाच्या वादातून चुलत भावाचा खून; दोघांना अटक

जिंतूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील साठे नगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत एका ३६ वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साठेनगर येथील सगननुर ऊर्फ छगन कुरेशी त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी व अमजद कुरेशी हे तिघेजण साठे नगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते. तिथे तिघांची पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली. यातील संशयित अमजद कुरेशी यांनी छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. यात छगन गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला परभणी येथे नेताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षण बुद्धीराज सुकाळे आदींनी भेट दिली. दरम्यान, मागील अकरा दिवसांत शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा 

परभणी: अपघातात जखमी झालेले प्रा. नितीन उंडाळकर यांचे निधन
परभणी: राणीसावरगाव येथील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले
परभणी: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा