काळजी घ्या! शहरावर विजांच्या कडकडाटासह पाऊसमायेचा अंदाज

काळजी घ्या! शहरावर विजांच्या कडकडाटासह पाऊसमायेचा अंदाज

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात आगामी तीन दिवस म्हणजेच बुधवार ते शनिवार या काळात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शहरात सलग तीन दिवस पाऊस झाल्यावर मंगळवारी पावसाने थोडी उघडीप दिली होती. 1 मार्च ते 14 मे या कालवाधीत शहरात 84 मि. मी. पावसाची नोंद झाली.
शहरात गेले तीन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (दि. 13 मे) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगरात 2.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी दुपारनंतर शहरात ढग दाटून आले आणि सायंकाळी सहा वाजता टपोरे थेंब पडण्यास सुरुवात झाली. मोठा पाऊस येईल, असे वाटत असताना पाऊस थांबला.
1 मार्च ते 14 मे या उन्हाळी हंगामात शहरात 84 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शहरात 24 तासांतील पाऊस
लवळे 7.5, बालेवाडी 15, हडपसर 4.5, एनडीए 3.5, कोरेगाव पार्क 3, शिवाजीनगर 2.9, वडगाव शेरी 2.5, लोहगाव 2.2, मगरपट्टा 2.2, पाषाण 1.4.
शहराचे कमाल-किमान तापमान
शिवाजीनगर 36.3 (22.7), पाषाण 36.8 (22.2), लोहगाव 36.3 (23.6), चिंचवड 39 (24.4), लवळे 38 (23), मगरपट्टा 37 (22.8), एनडीए 37 (21.4), कोरेगाव पार्क 39 (23.3).
हेही वाचा

मुखियाची बांधबंदिस्ती महायुतीतील बेकीची परिणती?
‘आयसर पुणे’ 162 व्या स्थानी : यंग युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर
Punjab Lok Sabha Election : पंजाबमध्ये हमीभाव, बेरोजगारी मुख्य मुद्दे