‘रामचरितमानस’, ‘पंचतंत्र’चा UNESCO ‘मेमोरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये समावेश

‘रामचरितमानस’, ‘पंचतंत्र’चा UNESCO ‘मेमोरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये समावेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले रामचरितमानस तसेच पंचतंत्र आणि सह्रदयालोक-लोकन या रचनांचा युनेस्कोने त्यांच्या ‘मेमोरी ऑफ द वर्ल्ड एशिया- पॅसिफिक रीजनल रजिस्टर’मध्ये समावेश केला आहे. मंगोलियाची राजधानी उलानबाटार येथे ७-८ मे रोजी झालेल्या मेमोरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड पॅसिफिकच्या १० व्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्लीत दिली. रामचरितमानस हे गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात लिहिलेले प्रसिद्ध महाकाव्य आहे.
भारतासाठी अभिमानास्पद क्षण
सहृदयलोक-लोकन, पंचतंत्र आणि रामचरितमानस हे अनुक्रमे आचार्य आनंदवर्धन पंडित, पं. विष्णू शर्मा आणि गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिले आहे. हा भारतासाठी अभिमानास्पद क्षण आहे, देशाचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक वारसाची ही पुष्टी आहे. ‘रामचरितमानस’, ‘पंचतंत्र’ आणि ‘सह्रदयलोक-लोकना’ या अशी कालातीत रचना आहेत ज्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीवर खोलवर प्रभाव टाकला. राष्ट्राच्या नैतिक जडणघडणीला आणि कलात्मक अभिव्यक्तीला आकार दिला. या साहित्यकृतींनी भारतासह आणि परदेशांतील वाचक आणि कलाकारांना प्रभावित केले आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA), ने मेमोरी ऑफ वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिक (MOWCAP) च्या १० व्या बैठकीदरम्यान ह्या एका ऐतिहासिक निर्णयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. उलानबाटार येथील बैठकीला सदस्य देशांतील ३८ प्रतिनिधी, ४० निरीक्षक आणि नामांकित व्यक्तींची उपस्थिती होती.

IGNCA च्या कला निधी विभागाचे प्रमुख आणि अधिष्ठाता (प्रशासन) प्रोफेसर रमेश चंद्र गौर यांनी भारताच्या रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकना या तीन कलाकृतींचे यशस्वीपणे सादरीकरण केले. यावर चर्चा केल्यानंतर आणि रेजिस्टर उपसमिती (RSC) कडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर आणि सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या मतदानानंतर तिन्ही नामांकनांचा समावेश करण्यात आला, असे सांस्कृतिक मंत्रालयाने नमूद आहे.
युनेस्को मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर काय आहे?
युनेस्कोचा द मेमोरी ऑफ द वर्ल्ड हा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे ज्याचा उद्देश डॉक्युमेंटरी वारसाचे रक्षण, संर्वधन आणि प्रवेश सुलभ करणे आणि त्याचा वापर करणे आहे. UNESCO ने १९९२ मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता.

🇮🇳 PROUD MOMENT FOR INDIA 🇮🇳
The Ramcharitmanas, Panchatantra, and Sahṛdayāloka-Locana enter ‘UNESCO’s Memory of the World Asia-Pacific Regional Register’ pic.twitter.com/GDiLHPGOqy
— PIB India (@PIB_India) May 14, 2024