पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये उद्या रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये उद्या रोड शो

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.१५) मुंबईमध्ये भाजप महायुतीचे मुंबई उत्तर-पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी घाटकोपर येथे रोड शो करणार आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोंदीचा भव्य रोड शो आयोजित केल्याचे कोटेचा यांनी सांगितले.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचा मार्ग
उद्या सायंकाळी साडेसहा वाजता मोदींचे विक्रोळी येथे आगमन होणार आहे. यानंतर रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून या रोड शो सुरूवात होईल तर, एम जी रोडवरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर मार्गावरून घाटकोपर पूर्वमध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.