१४ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत भावेश भिंडेवर बलात्कारासह 26 गुन्हे; जाणून घ्या ‘कारनामे’

१४ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत भावेश भिंडेवर बलात्कारासह 26 गुन्हे; जाणून घ्या ‘कारनामे’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mumbai Hoarding Collaps : प्रचंड वादळी पाऊस आणि धुळीचे वादळ अकस्मात धडकल्याने सोमवारी (दि. 13) संध्याकाळी मुंबई, ठाणे परिसराची धुळधाण उडाली. वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून असून 43 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मेसर्स इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक भावेश भिंडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग कोसळले
दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला
या प्रकरणी भावेश भिंडेसह इतरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कोण आहे भावेश भिंडे?
9 वी नापास असलेल्या भावेश भिंडे याचे वडील रिक्षा चालक होते. लहानपणापासून अत्यंत गरिबीत दिवस काढलेला भावेश भिंडे यांनी काही काळ एका जाहिरात एजन्सीच्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम केलं. त्यानंतर त्यानं होर्डिंगचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू त्याचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला. रेल्वेच्या जाहिरातींसाठी तो होर्डिंगचा वापर करत असे.
भावेशने 2009 साली मुलुंड इथून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना त्यानं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून त्याच्यावर सुमारे 26 गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. हे 26 गुन्हे विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याप्रकरणीचेच आहेत. हे सर्व गुन्हे सन 2009 पर्यंतचे आहेत. त्याचबरोबर एका बलात्काराच्या केसमध्ये देखील त्याच्यावर गंभीर आरोप असल्याचं समोर आलं आहे.
भावेश भिडे हा इगो मीडिया कंपनीचा मालक आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग याच इगो मीडिया कंपनीचं आहे. इगो मीडियाकडून मुंबई शहरात मोठे होर्डिंग लावले जातात. पण सोमवारच्या दुर्घटनेनंतर तो फरार आहे. तो राहत्या घरी सापडला नाही. त्याचा मोबाइलही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.