Loksabha election | नाव यादीत न आल्याने अनेकांची नाराजी..!

Loksabha election | नाव यादीत न आल्याने अनेकांची नाराजी..!

टाकळी हाजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, निमगाव दुडे, म्हसे, डोंगरगण, आमदाबाद, रावडेवाडी, माळवाडी, शिनगरवाडी येथे दिवसभरात शांततेने मतदान पार पडले. सकाळी शेतातील कामामुळे बहुतांश शेतकरी उशिरा मतदानाला बाहेर पडले. नवोदित मतदार व ज्येष्ठ नागरिकांनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. सव्वापाच वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने काही मतदारांना सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहचता आले नाही. सहानंतर आलेल्या मतदारांना मात्र मतदान न करताच परतावे लागले.
तसेच, अनेक मतदारांना मतदान यादीतून नाव गायब झाल्याने निराशा पत्करावी लागली. काही मतदारांची नावे दुसर्‍या गावांमध्ये गेली, तर काहींचे मागील वेळी मतदान करूनही या वेळी मतदान यादीत नाव आले नाही, असा अनुभव अनेकांना आल्याने मतदारांमधून नाराजी व्यक्त झाली. यामध्ये मुंबई, पुणे तसेच बाहेरगावाहून आलेले आणि काही स्थानिक मतदारांचा समावेश आहे. मतदान यादीत नाव न आल्याने भ्रमनिरास झालेल्या टाकळीहाजी, माळवाडी येथील काही मतदारांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा

गडकोटांवर पर्यटकांची अलोट गर्दी; सिंहगडावर टोल वसूली जोरात
गारपीट, वार्‍याचा मतदानाला फटका; आणे-माळशे मतदारांची पांगापांग
काळवाडीत बिबट्या जेरबंद; जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र जाहीर करा