भरधाव कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली; ६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.१३) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. #WATCH | Uttar Pradesh: Six died in collision between two vehicles on the Delhi-Lucknow …

भरधाव कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली; ६ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.१३) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

#WATCH | Uttar Pradesh: Six died in collision between two vehicles on the Delhi-Lucknow Highway in Garh Kotwali area of Hapur: Hapur ASP, Rajkumar Aggarwal pic.twitter.com/caN4rxImH7
— ANI (@ANI) May 14, 2024

गढ कोतवाली येथे मुरादाबादकडे जाणारी निळ्या रंगाची एक्सेल सिक्स कार सुमारे १५ फूट रुंद दुभाजक ओलांडून मुरादाबादहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून जखमींना गढ सीएससीमध्ये पाठवण्यात आले. अपघातानंतर मृतांच्या शरीरातून एवढा रक्तस्त्राव झाला होता की, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
हेही वाचा : 

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; गणेश दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; ३ चिमुकल्यांसह ९ ठार, २३ जखमी