आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे
गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आजचे राशिभविष्य घरातील बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ व्यतित कराल. आळशीपणामुळे कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना वेग येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रकृती चांगली राहिल.
वृषभ : कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील
श्रीगणेश सांगतात की, दैनंदिन दिनचर्या शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नियोजन कराल. यामुळे मनःशांती लाभेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर आणि आत्म-शक्तीवर विश्वास ठेवून पुढे जा. तुमच्या जवळच्या मित्रांशी आणि संपर्कांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. नकारात्मक वातावरण टाळा.
मिथुन : करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनतीची गरज
कुटुंबात घरामध्ये धार्मिक यात्रेचे नियोजन कराल, आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवल्याने आनंद मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. विद्यार्थी अभ्यास गांभीर्याने घेतील. अतिखर्चामुळे तणाव असू शकतो. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहिल. तरुणांनी मौजमजा करण्यापेक्षा आपल्या करिअर आणि भविष्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अशक्तपणा जाणवेल.
कर्क : प्रभावशाली लोकांशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ग्रहस्थिती चांगली होत आहे. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. काहीवेळा घरातील सदस्यांना जास्त हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रातील सर्व कामे आपल्या देखरेखीखाली केल्यास चांगले होईल. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवण्याची शक्यता.
सिंह:
श्रीगणेश म्हणतात की, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहार सुरु असतील तर यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. कोणत्याही सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरणात निराशा होऊ शकते. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात व्यावसायिक उदासीनतेची स्थिती असू शकते. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंददायी आणि गोड राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. आत्मविश्वासाने तुमची कार्ये पूर्ण कराल. तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. कुटुंबातील समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद अनुभवाल. असंतुलित दिनचर्या आणि आहारामुळे पोट खराब होऊ शकते.
तूळ: श्रीगणेश म्हणतात की, जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी कार्यात यश मिळू शकते. विवाहितांचे सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता. परिस्थिती संयमाने हाताळा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता chj;. काही वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होईल. पती-पत्नी व्यस्ततेमुळे घरात फारसे लक्ष देऊ शकणार नाहीत. मसालेदार अन्न टाळा.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जास्त कामात व्यस्त असाल. आर्थिक व्यवहारांमधील काही गैरसमजामुळे नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ शकतो. एखाद्याशी वाईट बोलणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. सार्वजनिक व्यवहार, ग्लॅमर इत्यादी व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. अतिकामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.
धनु : आज जवळच्या लोकांशी विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. घरामध्ये नूतनीकरण योजना सुरू करताना वास्तु नियमांचे पालन करा. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे मनात काही त्रास होऊ शकतो. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल.
मकर : श्रीगणेश म्हणतात की, आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात;पण तुम्ही काळजी न करता तुमच्या कार्यरत राहातुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्तता राहील. अतिआत्मविश्वास आणि अहंकार या दोषांवर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. घरातील वातावरण आनंददायी राहिल. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात गाफील राहू नये.
कुंभ : आज सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान राहील. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात, त्यावर लक्ष केंद्रित करा. घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक होऊ शकते याची काळजी घ्या. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर नवीन यश मिळवाल. कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.
मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला निरोगी वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.